वाया गेलेली शिकवणी

****************

आता सारी डिशनरीसुदधा पिळवटून काढली, इंग्रजीची सवय व्हायला हवी म्हणून सुदीप नगरकर, चेतन भगत याचं साधं इंग्रजी त्यानं वाचून काढलं, पण नाईलाज झाला त्याला काही ती भाषा तितकीशी जमत नव्हती, शेवटी त्याने ‘हाफ गर्लफ्रेंड’चा आधार घेत एक इंग्लीश स्पिंकीगचा क्लास लावला, इंग्रजीचे वाभाडे निघत चालले होते, चारचौघात सोडा….साधा अर्ज करण्यासाठीची चार जोडून वाक्यही लिहता येत नव्हती, सगळे उपाय करुन झाले होते, सगळयाप्रकारची इंग्रजी चार दिवसात शिकवणारी पुस्तकं वाचून झाली होती, शेवटी हाच उपाय, लावला क्लास, तो एकूण चार महिनाचा क्लास, दोन भाग केले होते कोर्सचे, एकात बेसिक इंग्रजी आणि दुस-यामध्ये एडव्हानस इंग्रजी याशिवाय पर्सनालिटी डेवलमेंटबदल जुजबी असं ज्ञान सांगणार होते. त्यांनी सरावासाठी काही पुस्तकं दिली होती, तिथं प्रक्टिकलमध्ये संवादवाचन, भूमिका वठवत बोलणे, व्याकरणविषयक नियम पुढे येऊन सांगणे म्हणजेच थोडक्यात सहभागी होतं शिकणे, या सगळ्यात त्याला राहून राहून श्रीदेवीचा (शशी गोडबोलेचा) इंग्लीश बिग्लीश आठवायचा, तो पार भिंवडीवरुन तिथं ठाणा स्टेशनपरिसरात येत होता, तीस पार झालं होतं वय, वयोमानापेक्षा तिथं शिकायला आलेली इतरजणं बरीच लहान होती त्यांच्यापेक्षा, पण लाजणंबुजणं काही नव्हतं, त्या फ्रान्सिस बाई बेसिक इंग्रजीचा कोर्स शिकवायच्या, इंतराना कधी काही कळलं नाही की हिंदी आणि जर कुणी मराठीत विचारलं तर मराठीत उत्तर दयायच्या, चव्वेचाळीस वय असलेल्या त्या नेहमी शर्ट-पैंटवर वावरायच्या, किती मोजून एक तासाचा लेक्चर सोमवार ते शुक्रवार त्यात एक दिवस थेअरी एक दिवस प्रक्टिल, तश्या ब-या शिकवायच्या, शिकवलेलं आलचं पाहिजे असा आग्रह करत बसायच्या, एखादयाला क्लासमध्ये उभा करत विषय देऊन चार वाक्य बोलायला लावयाच्या, निदान प्रयत्नाची, तोडकमोडक उत्तराची तरी अपेक्षा करत बसायच्या, तरीदेखील ठोंबाडयासारखा उभा राहिलं तर मग तसचं तासभर उभ्या करायच्या, बहुतेकवेळा तसं व्हायचं नाही पण एखादा लाजराबुजरा तसाच एक एक तासभर उभं राहणं पंसत करायचा, बाकी अंवातर खूप काही बोलत बसायच्या, त्यांना सकाळी सातपासूनच्या बॅचेस होत्या दुपारी तीनपर्यंत, तो मात्र नऊच्या बॅचला होता, तो अकरा वाजता वापस भिंवडीला एका गोडाऊनमध्ये कॉम्पुटर आपरेटरचा जॉब करायचा. ही इंग्रजीची खटपट दोन गोष्टीसांठी एक कामावर बढती आणि दुसरी राहून राहून दुबईला जायची इच्छा, यासाठी तिकडे जाण्याच्या कारणात इंग्रजीचा खोडा नको म्हणून ही शिकवणी. तिथं बाकी शिकायला आलेली इतरजण आणि हा सुदधा तसे रिलॅक्स होते, तिथं असलेल्या बाकी मुली खूप वेळा विषयांतर करत त्या फ्रान्सिस बाईना त्यांच्या घरच्या विषयाकडे न्यायच्या, फ्रान्सिसबाई  पर्सनालिटी डेव्हलमेंट बदल सांगताना आपल्या नव-याच्या बूटाच्या कलरचं, मौज्याचं उदाहरण दयायच्या, तिथल्या मुली लगेच विचारायच्या, बाई तुम्हाला मुलं किती, मग बाई आपल्या एकलुत्या एक मुलांच्या करिअरबदल सांगायच्या, त्याने कसं बीएमएस चूस केलयं, तो एकदा चांगला कामाला लागला की बाई नोकरी कशी सोडणार आहे वैगेरे वैगेरे….कशी तिला इथं त्यांच्यावरच्या शिक्षणापायी जबाबदारी घेत नोकरी करायला लागत होती, तो आणि इतर मुलं यांना यात काडीचाही रस नव्हता, ते नुसतंच एकत बसायचे, एकदा एका प्रक्टिकलमध्ये असचं फ्रान्सिस बाईनी त्याला विचारलं “तुझं इन्सपिरेशन कोण?” त्याने अश्या प्रश्नांची कधीच तयारी केली नव्हती, आपल्याला कुणी इन्सप्रायर केलं याचं उत्तर कधीच त्यांच्या डोक्यात नव्हतं, मग तेव्हा लोकसभा इलेकशन नुकत्याच संपल्या होत्या तो काहीसं डोक्यात ठेऊन बोलला “आपले नेते लोकं”… बाईना उत्तर गळी उतरत नव्हतं “अवर कन्टरी इज इन रॉन्ग हॅन्डस…” फ्रान्सिसबाई जश्या पटकन फाडफाड न विचार करता इंग्रजी बोलतात तसं आपल्याला यायला हवं असं सगळ्यांना वाटायचं, तो सुदधा आपला प्रयत्न करायचा पण अजून तितकासा प्रयत्न जमून आला नव्हता. बाकीचेही प्रयत्न करायचे, पॅरक्टिकलला तो स्टेज डेंरिग करत इतर कुणी पुढे यायला मागत नसताना  न घाबरता तिथं विषय मांडायचा… म्हणता म्हणता आता बेसिकचा क्लास संपला दीड महिना होतं आला.

आता पुढे दुस-या बाई एडव्हानस शिकवणार होत्या, तुलना करायची तर आवाज, चेहरा, वागणं, शिकवणं यातं जरासं अती या प्रकारात मोड-णातलं होतं सारं, या नवीन बाईचं नाव बेल्वेसा, त्या जास्तीपेक्षा जोरदार आवाजात एकदम त्या अमेरिकन एक्सेटंमध्ये बोलायच्या, अंगाने ब-या होत्या, वयाने पस्तीशीच्या आसपास, चष्मा वापरत. पुस्तक दुमडलेलं आवडत नसे, व्याकरण न शिकवता डायरेक्ट वाक्य कशी बनवत बोलता येतील यावर भर होता त्यांचा, तिथं बॅचमध्ये असलेल्याना बेल्वेसा बाईचा स्वभाव कळायला दोन दिवस गेले, मग काय वापस मागच्या फ्रान्सिसबाई सारखं यांना पण तशेच अंवातर प्रश्न सुरु केले आणि यां बाईचा प्रतिसाद पहिल्या बाईपेक्षा दुप्पट होता, असं वाटत होतं. त्यांना यांची जास्तच गरज आहे असं एकूण दिसून आलं, या बॅचमधल्या मुलींना इंग्रजी शिकण्यात रस नव्हताच मुळी, तो वैतागला होता पण असं धीटपणे काय बोलणार, त्या त्यांच्या डिप्रेशनमध्ये गेल्याची कहाणी सांगायच्या मग गाणी गुणगुणायच्या, इथल्या सगळ्या संगीतकाराची थू थू करायच्या, इथं आता कशी मेलडीच हरवलीय वैगरे वैगरे सांगत बसायच्या, त्यादेखील सात ते तीनची डयुटी करायच्या, नंतर संध्याकाळी सहा वाजता पण आपण आपले छंद जोपासतो त्याबदल सांगत बसायच्या, ती जेव्हा कधी स्वतःला दुखात असताना बाहेर काढण्यासाठी don’t worry be happy हे गाणं गुणगुणत बसते त्या बॉब मारली (bob marley) नावाच्या गायकाचं, त्या गाण्यांचा कसा आधार घेते ते सांगत बसायच्या, बरं हे संगळ त्या इंग्रजीत सांगायच्या म्हणून किमान त्याला बरं वाटायचं, असचं त्या बाई बोलण्यात खिश्चन धर्माबदल काहीतरी सांगत होत्या आणि मग तिथल्या त्या मुली लगेच तेव्हा रिलीज झालेल्या ‘कानजिगरीन टू’ चा विषय काढून बसल्या, झालं बाकी शिकवायचं सोडून बेल्वेसाबाई तिथं त्या सगळ्यांना भूतांखेताच्या गोष्टी सांगत होत्या. तो पार इतके दिवस तळकोकणातल्या लोकांना अडाणी म्हणून अंधश्रध्देच्या वाटेला जातात आणि असल्या भूताखेतातं अडून बसतात असं वाटायचं, पण इथं तर पार रोमला जाऊन तिथं असलेलीच लोक एकदम आतमध्ये जखडून राहिलेलं भूत काढू शकतात या विषयीच्या कथा ऐकत होता, ती म्हणायची इथल्या खिश्च्रन म्हणून अल्पसंख्याक समाजावर खूपच अन्याय झालाय, आता हे काय नवीन, असा तर अख्खा देशच म्हणतोय की आमच्यावर अन्याय झालायं म्हणून, तिथं असलेलं कुणीच बेल्वेसा बाईनां या विषयाला विरोधी बोललं नाही, त्यांना रात्रीची मिरवणूक काढू दिली जात नाही, त्यांच्या प्रार्थनास्थळांना धोका आहे वैगेरे…वैगेरे…खूप मोठी अन्यायगाथा सांगत सुटायच्या, स्वतच नाव सरळ न उचारण्याला फटकारायच्या आणि मग सरळ आपल्या अविवाहित असण्याच्या, कराव्या लागत असलेल्या नोकरीच्या, मागच्या कंपनीतल्या राजीनाम्याच्यां गोष्टी सांगायच्या, कशी तिला बाहेर सहा आकडी पगाराची नोकरी सोडून इथं असं शिक्षकी पेशात यावं लागलं, कंपनीसाठी ताजमध्ये गेल्यावर कसे तिने एटीकेटीस पाळत नोकरी टिकवली, इथले हिंदू कसे स्वतःच्या धर्माबदल अज्ञानी आहेत त्यांना तेहतीस कोटी देव म्हणजे कोटी म्हणजे करोड नसून कोटी म्हणजे रुपे आहेत असं सांगायला लागली, त्याला हे संगळ बघून वाटायचं हिने या बकबकीचे विडिओ बनवावे आणि टाकावे यूटयूबवर भरपूर फायदा होईल, ती मुळची साऊथ इडियंन पण एकदम मस्त मराठी बोलणारी, तिच्या एका नातेवाईकच्या मुलीचं ठरण्या-या लग्नाबदल आणि तिच्या अविवाहित असण्याचं आईवडील अप्रत्यक्षपणे करत असलेलं कमपेंरिझन इथं त्या मुलीनां सांगत सुटायची….. त्याही ऐकत बसायच्या, ती तिथल्या मुलीनां सांगायची, म्हणायची की लग्नानंतर तुम्ही इंडिपेडट नाही राहणार तेव्हा जपून वैगरे वैगरे, तिला तिच्या आईवडीलाची वाटणारी काळजी सारखी सांगून दाखवायची आणि हे देवाघरी गेल्यावर आपलं कसं होणार यांचीदेखील काळजी करत बसायची, ती खूप सारे पैसे कमवून एका क्रूझ टूरला जाणार होती खूप सारे देश फिरुन काढणार होती. ती ‘टूमोरो’ (tomorrow) (our)  आर  (were) वर या शब्दांना रोखून धरायची, योग्य उच्चार केल्याशिवाय सोंडायचीच नाही. ताे जेवढी अपेक्षा करुन तिथं आला होता तेवढा काय तो समाधानी नव्हता या कोर्स बदल….पण त्यांने नाही खंत वैगेरे व्यक्त केली नाही, का तर त्यांचा दुबईचा व्हिसा आता विना इंग्रजीच्या बाधेशिवाय मंजूर झाला होता. देशाचा प्रधानमंत्री बदलून पण लोक काही बदलत नव्हती ही त्याला स्वतः बदलची खंत हाेती.

****************

आजूबाजूची परिस्थिती एकदमच जाचक बनत चाललेली, त्याला सतत वाटायचं की त्यांच्या अधोगतीला आरक्षण कारणीभूत आहे, त्यांच्यापेक्षा कमी क्षमता असलेला इथं त्याची हक्काची नोकरी घेवून चाललायं, तो आता इथलं स्वप्न पाहतचं नव्हता, त्याला आता दुबईला जाऊन बक्कळ पैसे कमवून भारतात परत यायचे डोहाळे लागले होते, तो मागच्या संप्टेबरमध्ये झालेल्या आरक्षणाच्या मोर्चाने खूश होता आता काहीतरी आपल्या बाजूने होईल असं सतत वाटून होता, सुरवातीला कुठेही अस्पष्ट दिसणारी जात आता त्याला प्रत्येक गोष्टीसांठी हवी होती, तो त्यासाठी इतिहासाची पाळमुळं उखरुन काढायला तयार होता, जिथं जिथं शक्य होतं तिथं जातींची नाव त्याला हवीहवीशी वाट होती, कुठेतरी इतके दिवस मनाच्या एका कोप-यात हुदंके देत बसलेल्या त्या संवेदनला आता कुठेतरी जिवंत रुप आलं होतं. माणसंच्या माणसं एकामागोमाग एक शांततेत आपल्या मागण्यासाठी एक होत होती. त्याला आशा होती….लवकरात लवकर त्यांच्या बाजूने संगळ काही होईल…. सध्या मागणी त्यांच्यासाठी नसून येणा-या पिढीसाठी होती, आम्ही इथं खितपत पडलो, धडपडलो येणा-या पिढीने तसं असू नये असं वाटत होतं…… सध्या तो दुबईच्या वाळवंटात सुखाने झटत होता….इथल्या शिकलेल्या इंग्रजीचा काही त्याला तितकासा उपयोग झालाच नाही…त्या बेल्वेसाबाईचं लग्न झालं पण वडील वारले….त्या फ्रान्सिसबाईचा मुलगा आता कामाला लागलायं त्या आता इथं शिकवत नाहीयं….आणि तो अजून दुबईतच होता…त्यांच पाच वर्षाचं कॉन्ट्रैक्ट अजून संपल नव्हतं….इकडे आरक्षण भेटलयं…तो आता अजून काहीजणांना दुबईत घेऊन येणारं होता असं काहीसं बोलत होता……

-लेखनवाला    

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . ) 

Leave a comment