***हरिश्चंद्रगडावरचं खरेपणं***

******* मागच्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली पिकनिक यंदा हरिश्चंद्रगडाला जाऊन पूर्ण होणार होती. ही सगळी कामावर गट्टी जमलेली दोस्तीयारीतली माणसं. सगळ्यांचं एकत्र असं मागच्या कित्येक काळापासून भेटणं झालचं नव्हतं. पिकनिक कमी आणि ट्रेक जास्त होता. कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन बसावं असा साधारण मूड असताना कशाला उगाच पाय थिजवत डोंगर-माथा चढायचा असा विचार मनात होता, मग … Continue reading ***हरिश्चंद्रगडावरचं खरेपणं***

माझी नवी कथा “शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)” आता अमेझॉन किंडल

********** माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership). https://www.amazon.in/dp/B091FD93LS त्यांची सुरवातीची काही पान इथे वाचायला देत आहे. आवडल्यास संपूर्ण कथा वाचण्यासाठी नक्की अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक वाचा, लिंक वरती दिली आहे, आणि वाचल्यावर … Continue reading माझी नवी कथा “शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)” आता अमेझॉन किंडल

▁ ▂ ▄ ▅ ▆ ▇ █ बरबादीचा आलम █ ▇ ▆ ▅ ▄ ▂ ▁

जगण्यातल्या रोजनिशीतल्या घडामोडी 1.व्यवस्था ही शहर तुम्हाला अशीच चालवाचीयत तर तस सांगा, लोकांना जेरीस आणून आपण मात्र सुशेगाद जगायचं, आपल्या सोयीच्या गोष्टीसाठी सगळे नियम धाब्यावर बसवायचे, निवडणुका, प्रकाशन सोहळे, जय्यत तयारीने होणारे खाजगी समारंभ यासाठी कुठे असते सोशल डिस्टसिंग. लोकांना दररोज करावा लागणारा सार्वजनिक बस वाहतुकीचा प्रवास हा सध्या "आज कूछ तुफानी करते है " … Continue reading ▁ ▂ ▄ ▅ ▆ ▇ █ बरबादीचा आलम █ ▇ ▆ ▅ ▄ ▂ ▁

वृक्षासिनी

एमपीएसीच्या क्लासच्या बाहेरच्या आवारात तरुण मुला-मुलीचा घोळका नेहमीसारखाच. दुपारचे तीन वाजायला दहा मिनिटं होती, सतिश आणि बाकी जण तिथं कधीचेच येऊन तिथल्या घोळक्यात सामील होत वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होते, बरोबर तीनच्या ठोक्याला चालू बॅच संपून यांना आत प्रवेश मिळणार होता, त्याला आता या येणा-या खेपेला काही करुन एमपीएसी पास होत सरकारी नोकरी पक्की करायची … Continue reading वृक्षासिनी

‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव

0**0**0**0**0 ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि मार्चपासून सुरु झालेलं वर्क फ्रॉम होमचं सत्र संपलं, यावर्षी छत्री ही हातात घ्यावी लागली नव्हती इतका कडक लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम झालं होतं. आता खऱ्या अर्थाने कामावर जाणं क्रमप्राप्त झालं होतं, आमचा कामावर जाण्याचा कोरोना अगोदरचा प्रवास घरापासून अर्धा तास चालत मध्य रेल्वे स्टेशन गाठणं आणि पुढच्या साधारण … Continue reading ‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव

मुक्काम पोस्ट कॉरन्टाईन सेंटर

****** जसं रामाने रावणाला मारलं, ओबामाने ओसामाला मारलं, अगदी तसचं कोरानाला जर एकूण समाजाने मारायचं म्हणजे संपवायचं असेल तर मग ‘कॉरन्टाईन’ होणं हाच जालीम उपाय. करोनापूर्वी ‘कॉरन्टाईन’ या शब्दाचा तसा काही परिचय नव्हता पण आता हा जीभेवर रेंगाळला, ते शुदध मराठीत ‘विलगीकरण’ बोलायला मजा नाही येत… ते जीभेवरुन विरघळल्यासारखं वाटतं…. ****** काळाचं मनुष्याच्या शरीररुपी अस्तित्वाला … Continue reading मुक्काम पोस्ट कॉरन्टाईन सेंटर

कोरोना डायरी : रेशनिग

मुंबई उपनगरात ही लॉकडाऊन सुरु झाला होता आणि रेशनवाला उदया सकाळी साडेनऊ वाजल्यापासून दररोज शंभर नंबराना तांदूळ-गहू देणार असल्याची बातमी आता संध्याकाळी सातच्या सुमारास वा-यासारखी त्या डोंगरावरच्या झोपडपटटीत पसरली, त्या तिथल्या हजार-एक जणांची वस्ती असलेल्या परिसरात उदयासाठीची लगबग जोरात सुरु झाली, लोक अशेही घरात बसून बसून कंटाळली होते, टी.व्ही पुढे बसून झालं, शेजा-या-पाज-यात गप्पागोष्टी करुन … Continue reading कोरोना डायरी : रेशनिग

एक संध्याकाळ कवितेची…..

कार्यक्रम कसला? कविता वाचनाचा, कोण वाचणार कविता तर कवियत्री नीरजा, सो’कुल’ सोनाली कुलकर्णी, सौमित्र उर्फ किशोर कदम, प्रतिक्षा लोणकर, मुक्ता बर्वे, मिलिंद जोशी, हास्यकवी अशोक नायगांवकर आणि…. आणि…. नाना पाटेकर. ही अशी नाव लोकसत्ताच्या ‘अभिजात’ म्हणून सुरु झालेल्या उपक्रमाविषयीच्या ‘एक संध्याकाळ कवितेची’ नावाच्या कार्यक्रमाची माहिती पहिल्या पानावर बघितल्यावरच या कार्यक्रमाला जायला पाहिजे असं मनात पक्क … Continue reading एक संध्याकाळ कवितेची…..

ओटी, गा-हाणा आणि वायफाय

सुनंदा दरवशीप्रमाणं यंदापण देवीची ओटी भरुकं आपल्या दोन झीलांका घेवून माहेराकं ईला हूता. दोन झील…बारको सतरा आणि मोठो एकवीस वरशाचो. तळकोकणातला नारळापोफळीनं गच्च भरलेला गावं, गावाच्या कडेनं जाणारी नदी, तरीपण दोघवे काल संध्याकाळी मामाकडे ईलापासून हिरमुसले हूते. चारीबाजूनं डोंगर असल्याकारणानं मोबाईलचा नेटवरक दर दोन-दोन मिनिटानं येत-जायत व्हता. आता सकाळी ते दोघवे आवशीबरोबर देवळाकडे चाले हूते. … Continue reading ओटी, गा-हाणा आणि वायफाय

समाज आणि काम

वाशी नाकावरच्या मेन रस्त्यावर ती म्हातारी मागच्या दोन दिवसांपासून भीख मागत बसली होती, राहायची चेंबूरला…. म्हातारीचा नवरा वारला बाई जवानीत असताना, एकुलता एक मुलगा मस्त सिंधी कॉलनीजवळच्या सरळ रेषेत असलेल्या म्हाडाच्या ब्लिडिंगच्या शेवटच्या टोकाला लागून पसरलेल्या वीस-पचवीस घराच्या बैठया चाळीपैंकी एका घरात राहतो, एकच रुम त्यात पडदा टाकून किचन आतल्या बाजूला, सलग मोरी, तरी ही … Continue reading समाज आणि काम