कोरोना डायरी : रेशनिग

मुंबई उपनगरात ही लॉकडाऊन सुरु झाला होता आणि रेशनवाला उदया सकाळी साडेनऊ वाजल्यापासून दररोज शंभर नंबराना तांदूळ-गहू देणार असल्याची बातमी आता संध्याकाळी सातच्या सुमारास वा-यासारखी त्या डोंगरावरच्या झोपडपटटीत पसरली, त्या तिथल्या हजार-एक जणांची वस्ती असलेल्या परिसरात उदयासाठीची लगबग जोरात सुरु झाली, लोक अशेही घरात बसून बसून कंटाळली होते, टी.व्ही पुढे बसून झालं, शेजा-या-पाज-यात गप्पागोष्टी करुन झाल्या, मोबाईलवरती टाईमपास करुन झाला, पण एवढं संगळ करुन देखील पुन्हा पुन्हा वैताग येत होता, लोकांना बाहेर रस्त्यावर फिरता येत नव्हतं, घर एक खुराडा असला तरी आजूबाजूला सतत रोजच्या रहाटगाडयात व्यस्त असल्यामुळे तशी जाणीव आजपर्यंत होत नव्हती…..आणि झालीच तर ती बारा तासासाठी… आता ती चोवीस-तासासाठी… सतत… होत… होती… दाटीवाटीच्या गल्लीत असं कितीसं फिरणार… बाहेर फिरल्यावर पोकळ बांबूचे फटके बसण्याची दाट भिती मनात घर करुन होतीच. “आपल्या इथे कुठे येतोय कोरोना” असा बहुतेक जणांना विश्वास होता आणि त्या मस्तीत मास्क न घालण्याचा शिरस्ता काहीजणांनी अंगीकरला होता. आता या सगळ्यात ही रेशनवाली बातमी उगवल्यावर काहीतरी वेगळा विरंगुळा भेटला म्हणून यातल्या काही रेशनधारकांनी मनातल्या मनात जितक्या लवकर होईल तितक्या लवकर रेशनिंग दुकानावर नंबर लावण्याचा ‘पण’ केला होता, आणि यांसाठी किती वाजता उठणं सोईचं ठरेल यावर विचारमंथन सुरु होतं….इकडे रेशनिंग दुकानाचा मालक, किती दिवसानंतर तुंडूब भरलेली दुकानाच्या आतल्या बाजूची गोदाम पाहत होता, कोरोनापासून वाचण्यासाठी येणा-या लोकांना हदद घालून देण्यासाठी म्हणजेच सोशल डिस्टनस पाळण्यासाठी काय करता येईल यांचा विचार करत त्यांने दोन बांबू दुकानाच्या पुढच्या बाजूला उभे ठोकले आणि त्याला आडव्या लाईनीत सुतळी रश्या गुंडाळल्या, धान्य नेणा-या पिशव्या आत-बाहेर करता येतील अश्या… याशिवाय लोकांचे थब्म म्हणजे बोटांचे ठसे घेत आधारकार्डनुसार धान्यवाटप करत बसावे का यावर विचार करत होता… पण त्यात जास्तीचा वेळ जाऊन धान्यवाटपास वेळ लागेल या विचाराने त्यांने ते तसे ठस्से घेणे टाळण्याचे ठरवून टाकले… याशिवाय सगळ्यात महत्तवाचे या गोदामातल्या किती गोण्या काळ्या बाजारात विकता येतील यांचा अदमास घेणं चाललं होतं… त्याला या रेशनिगंवर धान्यवाटपास मदत करण्या-या गडयाला हाताशी धरत मापात उदयापासून कसं अजून नेहमीपेक्षा कमी तोलायचे हे समजावून टाकलं… तो बाकी रेशनिगं दुकानदारासारख्या रेशनिंग दुकानात इतर वस्तू विकायला ठेवायचाचं नाही… त्याचं या एवढयाश्या रेशनिंग धान्याच्या व्हवहारात कसं चाललं होत देव जाणे…. संध्याकाळचे आठ वाजले त्यांने दुकान बंद करायला घेतलं, सकाळपासून जो दुकानावर येईल त्याला उदया सकाळपासून धान्य वाटप होणार आहे सांगून सांगून जीव मेटाकुटीला आला होता… शेवटी त्याचा राग व्यक्त करायचा म्हणून एकदाचं शटर पायाने जोरात खाली आपटत खिश्यातल्या चाव्या बाहेर काढत खाली गुडघ्यावर बसत लॉक लावला… त्या रेशनिंग दुकानासमोरच्या रस्त्यापलीकडे त्याचं दुमजली घर होतं… त्यांच्या घरच्या वरच्या बाल्कीनतल्या खिडकीमधून तो सहज डोकावून रेशनिंग दुकानाकडे पाहू शकत असे…. आता घरची जेवणं आटपली.. आणि एकदाचा बाल्कनीपाशी येतं… रेशनिंग दुकानाकडे न्हाळून घेत.. नजर दुकानाच्या वरच्या नावाच्या पाटीपासून खालती लॉक केलेल्या टाळ्यापर्यंत नेत… उदयासाठीच्या कामासाठी तयार होतं…. अंथरुणावर जाऊन पडला…

http://lekanwala.home.blog

इकडे आता त्या डोंगरावरच्या झोपडपटटीत कमीतकमी चांगल तीस-पस्तीस घरात रात्री दहाच्या सुमारास पक्क झालं होतं की आता किती वाजता उठून नंबर लावायचा, प्रत्येक घरातला आपल्यापेक्षा कुणी पुढचा विचार करत लवकरात लवकर किती वाजता उठू शकतो यांचा अंदाज घेत होता. शेवटी यातल्या वीसएक जणांनी रात्री तीनचा अलार्म लावला… हो रात्री तीनचा… सकाळी साडेनऊ वाजता मिळण्या-या धान्यासाठी… तिथं रात्री तीन वाजता जाऊन नंबर लावण्याचा उददेशापैकीं एक होता की रेशनवाला धान्य फक्त पहिल्या शंभर नंबरास देईल… आणि शंभर नंबरास धान्य देईपर्यंत दुपारचे दोन तरी वाजतील, तेवढा वेळ कोण उन्हात तिष्ठत पडेल आणि त्यात आधीच कोरोना….. आणि आपला नंबर या शंभरात आणि त्यातल्या त्यात पहिल्या दहामध्ये असल्यावर आपली या धान्यवाटपापासून लवकरात लवकर सुटका होईल, आणि त्याशिवाय तसं होणार नाही तरी पण जर नंतर धान्य उरलंच नाही यांची बोंबा झाली की मग पंचाईत नको म्हणून हा सगळा इतक्या लवकर पहाटे उठण्याचा खटटाटोप…. आता इतक्या लवकर उठून तिथं रेशनिगंच्या दुकानाच्या इथें जाऊन टाईमपास कसा करता येईल यासाठी काय करता येईल यांची चाचपणी सुरु झाली…. यांतल्या काही जणांनी आपल्या मोबाईलची बॅटरी फुल करायला टाकली, याशिवाय एकाने जास्तीची पॉवरबॅक पण फुल करायला टाकली, याशिवाय एका घरात काल-परवा तळून ठेवलेल्या कुरडया घेतल्या, एकाने फरसाण घेतलं…. एक-दोन घरच्या बायकांनी काळी मेशरीची जास्तीची दोन पाकीट घेतली… एकाने पाण्याची बॉटल घेतली… काही जणांनी तिथं जमिनीवर थपकान मारुन बसण्यासाठी घरातली न्यूजपेपरची रददी घेतली… यात काही कॉलेजला जाणारी मुलं होत… पेब जीचं वेड असलेली… ते जास्तीचे पॉवरबॅक हयाचेचं… तशी ही पोरं बाहेर फिरायला रस्त्यावर भेटत नाय म्हणून वैतागली होती… किमान या निम्मित्ताने बाहेर जाता येईल म्हणून मुददामून धान्य घेण्यासाठी रेशंनिग दुकानावर येण्यासाठी तयार झाली होती… अशी ही सकाळ-संध्याकाळ झोपून झोपून फार कमी जणांना रात्रीची झोप लागत होती… त्यामुळेच अगदी सहजच तीन वाजता उठणं शक्य झालं होतं… ठरल्याप्रमाणे बेल झाली… अलार्म वाजला…..काही जणांनी उठल्या उठल्या चूळ भरली… आणि सरळ ब्रश केला… काहींनी प्रातंविधी उरकला…. काही शेजारांनी आपल्या शेजारा-च्या लगबगीचा अंदाज घेत आपला नंबर लावण्यास सांगत मी येतो थोडयावेळातच चा आवाज देत निवांत झोपले…. आणि असे करत किमान दहा घरातले तरी झोपडपटटीतल्या डोंगरामधली माणसं पटापटा खाली उतरत पहाटेच्या तीन दहाच्या सुमारास खाली उतरली… आणि रेशंनिगच्या इथें निंवात बसण्यासाठी जागा शोधू लागली…. यातल्या कुणाच्याच मनात “इतक्या लवकर का उठलो”चं दुख नव्हतं…. त्यातला एक जण आफिसात क्लार्क होता थोडक्यात त्याला खरडघश्शी करण्यात रस होता, त्याने ताबडतोब स्वतः सोबत आणलेल्या पिशवीतून एक पेन आणि फुलस्केप काढला आणि तिथल्या प्रत्येकाचं नाव लिहून घेवू लागला… एरियातली लोक एकमेंकाना चेहरपटटीने ओळखून असली तरी बरयाच जण्याची नाव माहित नव्हती… आता त्यांच्याकडे क्रमाने नाव लिहणं चाललं…होतं…. या क्लार्कने स्वतःच नाव सगळ्यात पहिलं लिहिलं… बाकीच्यानीं त्याला काही हरकत घेतली नाही… पण यांत ही काहीजण अशे होते जे स्वत: सोबत इतरांचेही नंबर लावत होते, त्याला या क्लार्कसाहेबाचा आक्षेप होता… त्या सगळ्यांना नाईलाजाने मान्यता देता… देता… साधारण साडेतीन वाजले.. आणि एकूण नंबर झाले… वीस… आणि उपस्थित माणसं फक्त तेरा…. आता ज्यांनी नाव लिहून दिली होती ती निवांत होत… इतत्र आपल्यासाठीची बसण्याजोगी… किमान पाठ टेकवता येईल आणि बूड स्थिर राहिल अशी सपाट जागा शोधू लागली… बहुतेकांना ती सापडली… तो क्लार्क मात्र रेशनिगंच्या शेटरपाशी पेन आणि फुलस्केप घेवून उभा राहिला… आता पावणेचारच्या सुमारास अजून काही लोकांचा जथ्था आला… यातल्या काही जणांनी मास्क लावला होता… काही जणांनी नाही… बायकांनी आपला पदर आडवा लावला स्वतःच्या तोंडाभोवती नुसता दिखाव्यापुरता तिथं आल्यावर लावला… या माणसांना पाहताच क्लार्क जोमात आला… त्यानें फुलस्केपवर नाव लिहून घेतली… आता चार वाजत आले…. आणि नाव झाली होती… पन्नास… यातली बरीच लोक मोबाईलमध्ये डोकं खूपसून बसली होती… काही बायकांनी आपली काळी मेशरी बाहेर काढली… काही जणांनी नुसतीच कोरोना, सरकार, अमेरिका यांच्यावर चर्चा सुरु केली… काहीनी कोकणात जाणा-या रेल्वेगाडया चार दिवसासाठी सुरु करायला पाहिजेचा गजर केला तर लगेच दुस-यांने तिकडे गावात पण आता कुणाक घेत नाय चा टाहो फोडला… आता त्यांच्या चर्चाना उधाण आले. इकडे ते पबजी वीर तालात होते, हाताना मुंग्या येईर्प्यंत ते तलीन झाले होते… त्या रेशंनिग दुकानाच्या आजूबाजूलाही बैठया चाळी होत्या.. आती ही रेंशनिगच्या इथली बडबड आजूबाजूच्या भिंतीना ऐकू येत होती… यात आता पाच वाजले… आणि त्या फुलस्केपवर शंभर नाव फुल झाली… या पबजी वीरांना अजूनही काही चिकन-डिनर मिळवण्यात यश मिळत नव्हतं… आणि येणा-या प्रत्येकाला “अरे आम्ही तर तीन वाजताच नंबर लावल्याचा” पराक्रम ते मोठया ऐटबाजीत सांगू लागले… आपण पाच वाजता उठून पाहिला नंबर लावू म्हणून स्वप्न पाहत असलेले हिरमुसले… त्यांना आता आल्या पावली माघारी जाणं भाग होतं… “रात्री तीन ही का वेळ आहे का…?”, “आता लोकांना काही कामधंदे उरले नाहीत तर ते तरी काय करतील…”, “आता मी पण बघा उदया रात्री बारा वाजताच नंबर लावतो….नायतर काय…” एकजण निर्धाराने बोलू लागला…. यात ज्यांनी कुरडया, फरसाण आणलं होतं ते आता चघळू लागले….आता या जास्तीच्या आवाजाने साडेपाचच्या सुमारास रेशंनिगवाल्याला जाग आली, आणि तो बाल्कनीच्या बाहेर बघतो तर ही तोबा गर्दी, सोशल डिस्टनिगं, मास्क लावणे या सगळयाची पार धजींया उडवून दिली होती… रेशंनिगवाल्याला बाहेर बाल्कनीत बघितल्यावर काहीजणांनी हात उंचावले… त्यांने ही मग नाईलाजाने हात वर केला… पण यात काही साडेपाच वाजता आलेल्या आणि शंभर नंबरापेक्षा जास्ती नंबर गेलेल्या लोकांना या तीन वाजता आलेल्या लोकांवर जोरादार आक्षेप घ्यायला सुरुवात केली… त्या क्लार्कच्या हातातला कागद हिसकावण्याचा प्रयत्न झाला… या वाढीव आवाजाने तिथल्या त्या रहिवाशांची झोपमोड झाली…. तितक्यात पहाटेच्या गस्तीला असलेली पोलीसाची गाडी साडेपाचच्या सुमारास आली खरी, पण शंभर एक माणसं रेशंनिग दुकानाच्या आजूबाजूने अंतर राखत बसलेली…. आणि काही पारच हमुरीतुमरीवर आलेली बघितली…. आणि हे सगळं नेहमीचचं आहे… यांत विशेष काही नसल्याचा निर्वाळा टाकत ती निघून गेली. आता कागद फाडण्याची भिती वाटल्याने त्या क्लार्कने लोंकाना नंबरप्रमाणे रांग करत उभे राहण्यासाठी विनवणी केली, पण पबजी वीर चिकण-डिनर मिळवण्यासाठी हटटाला पेटले होते…. त्या एरियतल्या बायका उपस्थित नसलेल्या शेजारीनच्या बाता एकमेकांला सांगत जास्तीच दंग झाल्या होत्या…. पण क्लार्कने जोरात ठसकवल्याने आता ते लाईनीत येऊन उभे राहिले… आता तो नाव पुकारत होता… आणि तशी लोक उभी राहत होती… यांत अशी ही लोक होती ज्यांनी दुस-याचें नंबर लावले होते खरे पण ती अजून आली नव्हती त्यांची फोनाफोनी चालली होती… जो आले नाहीत त्यांच्या नावापुढे तो क्लार्क फुली मारत होता…. या सगळ्या कसरतीत सहा वाजले… आणि रेशंनिगवाला थोडा वैतागतच मास्क लावून तिथे आला….“तीन वाजता उठून येता म्हणजे कमालच केलीत तुम्ही….” थोडा उपहासाने बोलला, .”

आणि एवढा सकाळी केवढा कालवा…. आजूबाजूला लोक झोपलीयतं… काय आहे का नाय….आणि एवढी कसली घाई…लगेच ताबडतोब घ्यायची.. आज नाही भेटलं तर उघा भेटेल…” तो तावातावाने बोलत होता…. हे सगळं बोलत असताना काही लोक त्या तीन वाजता नंबर लावलेल्या लोकांना शिव्या घालत होते… “मादरचोद साले….. मी पण बघा कसा रात्री बारा वाजता नंबर लावतो” च्या वल्गना सुरु झाल्या होत्या… रेशनिंगवालाने क्लार्ककडून तो कागद बघायला म्हणून घेतला आणि आपल्या खिश्यात टाकत तो थोडा पुढे चालत जात त्यांच्या गडयाला फोन लावला, तो पाच मिनीटात आला, तो त्यांच्या बरोबर एक पिशवी घेवून आला, आता रेशनिगवाल्यांनी ती पिशवी खोलली, त्यात एक पेटी होती आणि त्यातून लाईनीत ठेवलेली गोल आकाराची प्लॅस्टीकची नंबर लिहिलेली टोकन बाहेर काढली, आणि तो ती वाटू लागला… एक नंबर लिहिलेलं टोकन, दोन नंबर लिहिलेलं टोकन… शंभर नंबर लिहिलेलं टोकन…. झालं…. सकाळचे सात वाजत आले….आता टोकन वाटून झालीयतं… आता आज फक्त या टोकन असलेल्या शंभर लोकांनाच रेशन भेटेले…. आणि उदया साठीची टोकन आज संध्याकाळी आठ वाजता वाटली जातील…. आता ज्यांना टोकन भेटलीयत त्यांनी साडेनऊला या नायतर इथं वाटत बघत बसा….

http://lekanwala.home.blog

काहीजण नाईलाजाने माघारी फिरले, संध्याकाळी आठ वाजता येण्याच्या निर्धाराने… काही जणांनी जास्तीचा लावलेला नंबर वाया गेल्याची भावना मनाला लागून गेली…. त्या क्लार्कला आपला कागद काढून घेतल्याचा राग होता… पण किमान आपल्या जवळ एक नंबरच टोकन तरी आहे हयाचं समाधान तो राखून होता…. ते दोघे पबजी वीर आपआपली दोन आणि तीन नंबरची टोकन खिश्यात घालत, पॉवरबॅक मोबाईलला जोडत पुन्हा खेळू लागले… आता त्यांना बसल्या बसल्या इथं एक नवीन शोध लागला होता… मोफत वाय-फायचा आणि तो पण चांगल्या स्पीडचा…. आपला रोजचा मोबाईलचा नेटपॅक वाचल्याचा आंनद त्यांच्या चेहरावर होता… यासाठी आता दिवस-रात्र येऊन बसण्यासाठी नाल्याजवळची जागा देखील या दोघांनी फिक्स केली होती…. आता तो क्लार्क काहीच लिहण्यासारखं न उरल्यामुळे त्या दोघ्या पबजी वीरांच्या मोबाईलवर पाहू लागला… “आईझवारा… अजून चिकन डिनर भेटोक नाय…. रांडेच्या मोबाईलमध्ये लक्ष ठेव….अक्करमाश्या…” त्यातला एक पबजीवीर दुस-या पबजीवीराला बोलत होता… बाकी ज्यांच्याकडे करण्यासारखं काहीच नव्हतं ते अशेच माश्या मारत उभे होते… पण कुणीही आता इंथून निघून साडेनऊ वाजता येऊ या विचाराचा नव्हता… त्यांना सगळ्यांना वाटत होतं की एवढं शंभरजणांना धान्यवाटप करायचे म्हणजे रेशनवाला किमान एक तास अगोदर म्हणजे साडेआठला तरी दुकान उघडेल…. आणि झालं ही असचं… तो गाडी माणूस आला… त्यांने सव्वाआठला शटर ओपन केलं… पाचच मिनिटात… रेशनवाला आला… तिथं लाईनीत उभे असलेल्या प्रत्येकांच्या चेहरावर समाधान दिसू आलं… त्याने सुरवातीला एका कोप-यात असलेल्या देव्हारात पणती लावली, नंतर अगरबत्ती लावली…हात जोडले… आणि तो आणि त्यांचा गडी आतल्या बाजूला जात थोडी चर्चा केली… वजनाच्या बाबतीत कसा हात बेमालूमपणे आखडता घ्यायचा यांची पुन्हा एकदा उजळणी केली….“थम्ब घेणार नाय….तेवढा टाईमपास करायला आता वेळ नाय….तांदूळ, गहू वाटले की पुन्हा तेल आणि डाळ वाटायची हाय…. फक्त रेशनिग कार्ड काढून ठेवा”चा मोठा टाहो फोडताच, लाके सतर्क झाले, इकडे पबजीच्या खेळात आता शेवटी तिघे उरले होते… हे दोघे पबजी वीर… आणि त्यांचा शत्रू… याला मारलं की त्यांना तीन वाजल्यापासून खेळल्यानंतर आता चिकन-डिनर म्हणजेच विनर घोषित होणार होते….इकडं धान्य वाटप सुरु झालं….क्लार्कने रेशनकार्ड पुढे केले….रेशनवाल्याने त्याच्या रेशनकार्ड वर नोंद केली… पावती बनवली…ती पावती गडयाकडे दिली…गडयाने पावतीकडे बघत पावती समोरच्या त्या खिळ्यात घुसवली…. ही स्टाईल असते काम करण्याची…. तो गोणीतलं धान्य उपसू लागला, आणि समोरच्या वजनकाटयात टाकू लागला… क्लार्क आपल्या आणलेल्या पिशवीत ते धान्य घेवू लागला….कुणालाच वजनकाटयाचं पडलेलं नसतं…धान्य भेटतयं ना…. इकडे रेशनवाला पुढचं रेशनकार्ड येण्याचं पाहू लागलं… ते येईच ना… त्याने थोडं डोकावलं तर दोघजणं मोबाईलध्ये डोकं खुपसून होतें… त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या लोकांनी एकच कोलाहल सुरु केल्याबरोबर दोघेही बावरले.. कशीबशी रेशनकार्ड पुढे केली….आणि दोघांनी धान्य पिशवीत घेतलं आणि पुन्हा एकदा ते चिकन-डिनर भेटण्यापासून वंचित राहिले…

**************

शहरामध्ये पायाभूत सुविधा असताना लोकांना बारकोडसहीत पारदर्शकरित्या आधार क्रंमाकाचा वापर करत घरपोच धान्य कोणत्या वर्षी देणार कोण जाणे?

#withme# quarentineandchill# untiltomorrow# safehands#MyPandemicSurvivalPlan#MarathiBlog#Mumbai#मराठी#करोनो#corona#Covid19#Coronavirus#StayHomeStaySafe

————————————–

लेखनवाला ( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )

Leave a comment