अल्गोरिदम – ओपन भिकारी क्लोज भिकारी

**************

सोसायटीचा आठ तासांच्या डयूटीवर नेमलेला सेक्रेटरी तावातावाने त्या मोठाल्या टॉवर असलेल्या इमारतीच्या बाहेरच्या रस्त्यावर तावातावाने येत जोरजोरात ओरडत सुटला, “मादरचोद लोकांनो निघा येथून, आईझवाडयांनो ! जाता का पोलीसांना बोलवू”.

**************

रेल्वेस्टेशनच्या अगदीच लगतच्या उच्चभ्रू टॉवरच्या गेटच्या समोरील रहदारीच्या रस्त्यावर हल्ली दोन दिवसांपासून लाईनत चार भिखारी बसू लागलेत, भिखारी म्हणजे पार भिखारी…एकाचा हात नाही, एकजण पूर्ण अंगाने अधू, एकजण दोन्ही पाय गमावलेला आणि एकाचा चेहराच विचित्र न बघवणा-यासारखा…… त्यांचा एक डोळा निकामी, याशिवाय डोक्यावर सफेद पटटी गुंडाळलेली, या सगळ्याकडे आपआपले वाडगे होते, मुळात हा रस्ता हायवे रोडला संमातर….. या दोघामध्ये एक बंद पडलेला मोठा अवाढव्य असा इंड्रस्टीलयल बिल्डींगचा एरिया, बिल्डरचा प्रोजक्ट फसला आणि बांधकाम अर्धवट राहिलं. कित्येक वर्ष….. त्यामुळे हया बाजूने येणं केव्हाही चालत येण्यासाठी चांगलं…… वाहनांची रहदारी नाही…… मस्त मोकळा रस्ता……  एका बाजूला मोठमोठाल्या इमारतीचे न मोजता येणारे टॉवर आणि दुस-या बाजूला बांधकामने बंद पडलेला हा इंन्डस्टीरअरल इंडस्ट्रीचा एरिया…….हो आणि दोन्ही एकाच बिल्डरने बांधलेले…… हे टॉवर झाले पूर्ण…. पण हा इंन्डस्टीरअरल इंडस्ट्रीचा एरिया राहून गेला…… काहीतरी वरती मोठया लोकांसोबत बिघडला संबंध आणि प्रोजेक्ट थांबला…… सकाळच्यावेळी या वाटेने खूप लोक जातात त्यामुळे इथे कमाई जास्त होईल या आशेने आलेले हे भिखारी…… आणि मागच्या दोन दिवसापासूंन होत ही तसंच होत होतं……  असं भिखारी लोकांना काही दान केलं की चांगल काही होईल…… किंवा पापक्षालनासाठी आवश्यक कर्म म्हणून खूप सारी लोक दान करतात…… याशिवाय एखादयाला दया आली की……  आस्था वाटू लागली की…… आणि कधी कधी लोक नुसते पैसे देत नाहीत तर घरचं शिळंपाक अन्न, जुने कपडेलत्ते आणून देतात……  असो, तर या भिखा-यांना आता आशा लागली होती की हीच आपली रोजची जागा झालेली आहे आता निंवातपणे इथेचं रोज भीख मागायची, त्याप्रमाणे आज तिस-या दिवशी ते आले, लाईनीत थोडथोडक्या अंतराने बसले सकाळी सात वाजल्यापासून, आता सव्वा आठ वाजले, एकजण समोरुन येत होता, आता त्या येणा-या माणसाने यांच्याकडे बघितलं, हात पाठी पॅन्टीकडे वळला…… पॅन्टीच्या खिश्यातून पाकीट काढत पैसे देणार इतक्यात समोर त्या मोठाल्या टॉवरच्या गेटजवळचा माणूस आला “मादरचोद लोकांनो निघा येथून…… आईझवाडयांनो जाता का पोलीसांना बोलवू….. तुम्ही तरी सुशिक्षित दिसता ना, कशाला भीख घालता यांना…..उठा उठा ईथून….भेनचोद….”. त्याचें ते हातातले पैसे त्या वाटग्यात पडण्याअगोदर ते चौघे एका दमात तिथूंन पळायला लागले त्यातला तो पाय नसलेला पार सरपटतच निघाला होता…… ” पुन्हा या एरियामध्ये दिसलात तर सरळ पोलीसांकडे देईन….जेव्हा थर्ड डिग्रीचा बांबू घुसेलन ना तेव्हा कळेल पॉश एरियात येवून भीख कशी मांगतात ते….च्यायला दोन दिवसांपासून त्या रिटायर म्हाताराने हैराण केला बघ….. बघ त्या बेगरकडे…. बघ त्या बेगरकडे….हाकलवं त्याला…. बघ म्हणून….” सेक्रेटरी घसा सुकेपर्यन्त नुसता बोलत सुटला. तो पैसे देणारा तिथूंन केव्हाच निघून गेला.

**************

आजूबाजूला चालणारे लोकं एकाच क्षणाला थांबले, काहीजणांनी नियमित कानात टाकलेले एअरफोन काढत कायतरी झालं असल्याचं कळून येत असल्याचं कळताच जिज्ञासा दाखवली, त्या लोकांच्या रहदारीतून वाटत काढणा-या त्या चौघाकडे…. भिखा-याकंडे….. दूर दूरवरच्या नजरा आता खिळल्या होत्या…. आस्थेचा खूप मोठा थर तिथल्या वातावरणात दिसत होता……पण तो काय कामाचा?…. काही सेंकदातच चित्र पालटलं… लोकं होती तशी मूळ स्थितित आली…. एअरफोन पुन्हा तसेच कानात टाकले गेले…. पण अजूनही जिज्ञासा कायम होती… “अहो इथं लोक माहिती आहेत ना कसली हाय-फाय, वरच्या क्लासची राहतात आणि इथं येऊन भीख मांगतात…”, “अहो मग सोसायटीच्या मिंटीगला सेक्रेटरीकडे बोट दाखवतात.….”, “त्यांच पण बरोबरच आहे….”, “अहो पण लोकांना कळायला नको…”, “ अरे एवढीच जर हौस असेल तर न्या स्वतःच्या घरी आणि पोसा म्हणावं….” एकनाअनेक सुर येत होते. तो सेक्रेटरी आता गेटच्या आत जात होता. बहुतेकजणांना एकूण काय झालं यांचा अंदाज आला, ज्यांना व्यक्त व्हायचं होतं ते थांबले…. बाकी तसेच पुढे निघून गेले….

**************

सकाळच्या वेळी लोक रेल्वेस्टेशन गाठण्यासाठी दोन रस्त्यापैकीं एक असलेल्या या मोठया रुंदीच्या, दोन किलोमीटर सरळ असणा-या, वाहनाची जास्त रहदारी नसलेल्या, रस्त्याने जाणं पंसत करतात, जागा अगदीच करेक्ट निवडली होती कुणाचं बरं सिलेक्शन होतं…..या भिखा-यांना इथं लावणा-या आणि यांच्याकडून हप्ता वसूल करत स्वतःला मालामाल करुन घेतलेलें शब्दशः भिखारी…..अशे हप्ते घेणारे छोटे मासे… यांचे असे खूप सारे मोठे मासे वरती असतात…थोडक्यात अल्गोरिदम फार गुंतागुंतीचा….. त्यांना इलेक्शनला या पैशाचा उपयोग होतो त्यामुळी अशी दुकानं चालू राहावी यासाठी हा सगळा खटाटोप…..

**************

थोडं पुढे गेल्यावर ते चौघे एका जागी थांबले, एकाने फाटक्या पॅन्टीच्या आडून मोबाईल काढला, टचस्क्रीन….फोन कॉलिग….”काळजी करु नका….आजचा दिवस तो मेन रेल्वेफाटकाचा एरिया पकडा, नंतरच नंतर बघू….. सांगतो….” त्या छोटया माशांने फोन ठेवला. ते भिखारी फाटकाच्यां दिशेने निघाले…..

**************

-लेखनवाला    

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before  publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )

Leave a comment