एक संध्याकाळ कवितेची…..

कार्यक्रम कसला? कविता वाचनाचा, कोण वाचणार कविता तर कवियत्री नीरजा, सो’कुल’ सोनाली कुलकर्णी, सौमित्र उर्फ किशोर कदम, प्रतिक्षा लोणकर, मुक्ता बर्वे, मिलिंद जोशी, हास्यकवी अशोक नायगांवकर आणि…. आणि…. नाना पाटेकर. ही अशी नाव लोकसत्ताच्या ‘अभिजात’ म्हणून सुरु झालेल्या उपक्रमाविषयीच्या ‘एक संध्याकाळ कवितेची’ नावाच्या कार्यक्रमाची माहिती पहिल्या पानावर बघितल्यावरच या कार्यक्रमाला जायला पाहिजे असं मनात पक्क … Continue reading एक संध्याकाळ कवितेची…..

ओटी, गा-हाणा आणि वायफाय

सुनंदा दरवशीप्रमाणं यंदापण देवीची ओटी भरुकं आपल्या दोन झीलांका घेवून माहेराकं ईला हूता. दोन झील…बारको सतरा आणि मोठो एकवीस वरशाचो. तळकोकणातला नारळापोफळीनं गच्च भरलेला गावं, गावाच्या कडेनं जाणारी नदी, तरीपण दोघवे काल संध्याकाळी मामाकडे ईलापासून हिरमुसले हूते. चारीबाजूनं डोंगर असल्याकारणानं मोबाईलचा नेटवरक दर दोन-दोन मिनिटानं येत-जायत व्हता. आता सकाळी ते दोघवे आवशीबरोबर देवळाकडे चाले हूते. … Continue reading ओटी, गा-हाणा आणि वायफाय

समाज आणि काम

वाशी नाकावरच्या मेन रस्त्यावर ती म्हातारी मागच्या दोन दिवसांपासून भीख मागत बसली होती, राहायची चेंबूरला…. म्हातारीचा नवरा वारला बाई जवानीत असताना, एकुलता एक मुलगा मस्त सिंधी कॉलनीजवळच्या सरळ रेषेत असलेल्या म्हाडाच्या ब्लिडिंगच्या शेवटच्या टोकाला लागून पसरलेल्या वीस-पचवीस घराच्या बैठया चाळीपैंकी एका घरात राहतो, एकच रुम त्यात पडदा टाकून किचन आतल्या बाजूला, सलग मोरी, तरी ही … Continue reading समाज आणि काम

झाड आहे साक्षीला

अख्खी फॅमिली राहायची विठठलवाडीला पार तिकडे ठाण्याच्या पण पुढे आणि रामनाथचा जॉब मुबंईला सांताक्रूझला, रोजचा ट्रेनचा प्रवास होता, अजून बरीच वर्ष बाकी होती रिटायर व्हायला. बक्कळ कमाई रोजची. कामावरुन सुटल्यावर खिश्यात नुसती नोटांची बंडल….आणि त्यांचा चुरळा ठरलेला, कारण तो ट्राफिक हवालदार होता. मागच्या कित्येक वर्षापासून तिथल्या त्या पी. एन. वाळवे रस्त्यावर ठरलेली डयुटी होती, सगळे … Continue reading झाड आहे साक्षीला

जगण्यातला भित्रा ससा

********************************* जितकं आमचं जग आहे तितकं तरी आम्हाला जगू दया. ********************************* लहान असताना ‘छान छान गोष्टी’च्या पुस्तकात एका भित्र्या सशांची गोष्ट होती, झाडांवरुन पान जरी पडलं तरी त्यांला ढग कोसळल्यासारखं वाटायचं, तो असं का वागला असेल, घबराटी वातावरणाच्या गोष्टी सतत कानावर आल्यामुळे की?, तो पहिल्यापासूनच भित्रा होता?, की त्याला तसा अनुभव होता? आणि खरचं जर … Continue reading जगण्यातला भित्रा ससा

हिजडा आणि क्रमवार निरीक्षणं

हिजडा आणि निरीक्षणं : क्रंमाक एक : कचरेवाला रोज सकाळ व्हायची, तो कामाला जायला निघायचा, मेन रस्त्याअगोदर तिथं एक हनुमानाचं छोटसं मंदिर होतं आणि बरोबर त्यांच्याअगदी समोर एक भलमोठं गणपतीचं मंदिर दोन्हीकडे अनुक्रमे शनिवार आणि मंगळवारी गर्दी असायची, त्यांच्यापुढे सुरु व्हायचा रेल्वेस्टेशनला जाणारा रस्ता आणि बसस्टॉप, समोर येणारी बस पकडण्यासाठी बसस्टॉपच्या अगोदरच त्या हनुमान मंदिरापाशी … Continue reading हिजडा आणि क्रमवार निरीक्षणं

शमा आणि परवाना

कामचुकारपणा त्यांच्या रक्तात नव्हता तरी तो तिथं मनापासूनं काम मात्र करत नव्हता, आता पण तो डेक्स सोडून, बाहेर आला, तिथं जवळजवळ पाचशे कर्मचारी कानाला ते मोठालेवाले हेडफोन लावून समोरच्या कस्टमरला माहिती देण्याचं काम करतं होते, हयाचं मात्र अजिबात लक्ष नव्हतं, त्यांना दिवसाला दोनशे कॉल करणं कम्पलसरी होतं. हा मात्र नेमकेचं एकशे सत्तरच्या आसपास करी, त्यांचा … Continue reading शमा आणि परवाना

माकडहत्या

आज पुन्हा कामावर जायला निघताना उशीर झाला, रेल्वेस्टेशनला पोचलो एकदाचा, मला मुंबईच्या दिशेने जायचं होतं…प्लॅटफॉर्म क्रंमाक एक वर येणारी रेल्वेगाडीसुदधा उशीराने होती. घडयाळात नऊ पस्तीस वाजले होते, अजून नऊ वीसची स्लो लोकल गाडी आली नव्हती, सगळा प्लॅटफॉर्म प्रवाशांनी भरत चालला होता, इतक्यात उदघोषणा झाली प्लॅटफॉर्म क्रंमाक तीनवर जलद लोकल गाडी थोडयाच वेळात येत असल्याची, याशिवाय … Continue reading माकडहत्या

निसटणं आणि टिकणं

        तलावाच्या शहरातल्या तलावापैकी हा एक तलाव, अगदीच छोटेखानी, त्यांचे खोलवरचे सगळे पाण्याचे झरे विरत चालेले, हल्लीच तलावाच्यावरुन एका उडडाणपूलाचं बांधकाम झाल्यापासून तर तिथल्या पाण्यात सूर्यकिरणं यायला वावच राहिला नव्हता, या असल्या वातावरणात तिथं तंग धरु शकतील असे वनस्पतीजीव, जलचराचं मात्र यामुळे फारच हाल होतं होते. इथं अस्तित्वच टिकुन न राहण्याची परिस्थिती उत्पन्न होऊन बसली … Continue reading निसटणं आणि टिकणं

सचिनची रिटायरमेंट आणि नाईटपाळी

गुरुवार संपत आला होता, काही अवकाश राहिला होता त्या कमर्शियल बिल्डींगच्या आठव्या मजल्यावरल्या ऑफिसात सेकंड पाळीची माणसं जाण्याची आणि त्यांच्याजागी तिस-या पाळीची म्हणजे नाईट पाळीची माणसं येण्यासाठी. लगबग जोरात सुरु होती, तिथं आपली वेळ नोंदवण्यासाठीच्या थम्पवाल्या मशीनकडे जोरदार गर्दी जमत होती, हळूहळू ती ओसरायला लागली, मी बरोबर अकराला थम्प करुन काम करायच्या जागेवर येऊन बसलो, … Continue reading सचिनची रिटायरमेंट आणि नाईटपाळी