व्हिलेज डायरी

इतरवेळी करतो तसा जनरल डब्यातून कोकणरेल्वेचा प्रवास यावेळी मुददामून टाळला, हा इतरवेळचा प्रवास म्हणजे धावत जात गाडी पकडणं नव्हे किमान कोकणरेल्वेसाठी तरी नाही….म्हणजे अजून इतरवेळचा प्रवास म्हणजें काय तर….इथं जर रात्री अकराची मंगलोर गाडी आणि त्यातही जनरल डबा ठाणे रेल्वेस्टेशनवरुन पकडायचा असेल तर लोक नंबर कधी लावतात फॅल्टफार्म नंबर पाच वर…… आदल्या दिवशी रात्री अकरा … Continue reading व्हिलेज डायरी

आले ‘बोक्या’च्या मनी

पुढयात पडलेल्या मादेली, पापलेटच्या घरी तळलेल्या या खंडक्या पुढचे काही दिवस ताटात पडणार नव्हत्या, देवदर्शनासाठी बाहेरगावी रेल्वेने जाणारं होते बहुतेक सगळे… त्याच लगबगीत होते सारे… सामानाची बांधाबाध सुरु झाली…. आणि अखेरीस तो दिवस उजाडला…. तयारी झाली एकदाची, एक-एक करत सगळ्या बॅगा घराबाहेर आल्या, कुलूप लावण्याअगोदर, लाईटचा मेन स्वीच बंद केल्याचं पुन्हा बघितलं, गॅसचा रेग्युलेटर दोनदा चेक … Continue reading आले ‘बोक्या’च्या मनी

वधूसंशोधनाची गाथा

प्रातःकाळच्या सकाळी घरपोच पाणी पोचवणा-या नळयोजनांनी आमच्या मात्र तोंडच पाणी पळवत पार झोप उडवून दिली. सकाळप्रहरी गावच्या त्या टोलेजंग घराच्या माडीवरुन पाण्याचे वहन होणा-या पाटास आपल्या हातानी हंडा नावाच्या स्थायूरुपी पदार्थात द्रव साठवून स्वघराकडे नेणा-या या स्त्रीयांना पाहण्यातील मजा आणि ख-या अर्थी आमचा एकूणच रामप्रहरी उठण्याच्या हेतूपुरेस्तर चांगल्या सवयीचा या लोकांनी विकासाच्या नावाखाली घरपोच पाणी पोचवून हिरमोड … Continue reading वधूसंशोधनाची गाथा

मच्छरवाणी- एक गुप्त वार्ता (एका मच्छरप्रमुखाचे भाषण)

अंत्यत थोडया कालावधीत समाजात दूरवर पसरण्याची कला, तसेच समाजातील अस्वच्छ दुर्लक्षित परिसरात विशेष ठाण मांडून मोठमोठाल्या इस्पितळातील डॉक्टर लोकांस आपल्याविषयी दखल घेण्यास भाग पाडणा-या, नाजूक दिसूनही आपल्या ताकदीचे भान करुन देणा-या, हलक्या आणि उडत्या चालीचे म्हणून हीनवलेले जाणा-या आपल्या 'मच्छर' या कीटकजमातीस, त्यांच्या सामाजिक बांधिलकीविषयी आणि एकूणच त्यांच्या सदयस्थितीविषयी चावा संघटनेचा प्रमुख या नात्याने हा … Continue reading मच्छरवाणी- एक गुप्त वार्ता (एका मच्छरप्रमुखाचे भाषण)

हा देश रोडी पाहताना…… ‘बस’ ना आता ! !

एव्हाना कामावरती ठरवून लवकर निघायचं आणि फक्त दहा रुपयांच्या तिकिटात केवळ दहा मिनिटात संपणारा प्रवास एक तास करण्यातली मजा ‘टॉफिक’ नावाच्या मानवनिर्मित समस्येचा 'वाहनसंख्याची वाढती गर्दी आणि अंरुद रस्ते' यामुळे घडणारा हा एथेच्छ प्रवास ‘घरातील बायकोसोबतच्या भांडणाच्या कटकटीपासून सुटका’ या वैश्विक समस्येशी केलेली उत्तम तडजोड अन्यत्र कुठल्या देशात होत असेल असे वाटत नाही, आपण सुरवातीच्याच स्थानकात … Continue reading हा देश रोडी पाहताना…… ‘बस’ ना आता ! !

पलीकडलं जगणं

झोपडपटटीच्या त्या शेवटच्या कोप-यातल्या गल्लीतील चाळीत माझ्या घराला लागून सातवी खोली… सुमार आणि मोडकळीस आलेलं ते घर, सताड उघडा दरवाजा, एक झाप बंद असलेल्या खिडकीपाशी एकटक समोरच्या रहदारीच्या रस्त्याकडे त्या अशाच आशाळभूत नजरेने एकटयाच वाट पाहत बसायच्या. मी हल्लीच त्यानां पलीकडून बघायला लागलो होतो. पूर्वी वेळ नसायचा आता मी निवांत होतो. वयाच्या सत्तरी उलटलेल्या सुरकतलेल्या चेह-यावरचे निस्तेज भाव, वाढलेल्या साधेंदुखीमुळे नीटसं चालता न येणं….खोकला … Continue reading पलीकडलं जगणं

परीक्षा, पेपर आणि समुद्र!

सकाळी साडेचार वाजता उठायचं! का तर…? सकाळी एकदम टाईमावर सात वाजता परीक्षाक्रेंदावर हजर व्हायचं… कशाला? साडेनऊ वाजताच्या पेपरसाठी…पेपर किती?…तीन… पहिले दोन पेपर झाले की साडेबाराला सुटका आणि….पुन्हा तिसरा आणि शेवटचा पेपर होणार दोन वाजता.... तो अडीच तासाचा… म्हणजे एका दिवसात तीन पेपर देवून मुक्तता होणार ती सांयकाळी साडेचार वाजता…परीक्षेला मित्र म्हणावा सोबतीला तर कोणी नाही…मग चला एकटेच… … Continue reading परीक्षा, पेपर आणि समुद्र!

दुपारची झोप

सणवाराला सकाळपासून चालेली जेवणाची लगबग पोटात कावळे जमा करतं…मिनिटामिनटाला आवंढे गिळणं चालू होतं…पण अजूनही तुम्ही भूकेच्या तटावर उभे राहत निमूटपणे सहनशक्तीशीं निकराची लढाई करत असता….कधी एकदा नैवदयाचं ताट देवापुढं ठेवलं जातयं, आणि तुम्ही जेवताय असं होऊन जातं…जीभेचं तातकळणं सुरु व्हायला लागतं…पण अजून अवकाश असतो… जेवणाच्या तयारीची लगबग सुरु होते एकदाची… तुम्ही स्वयंपाकघराच्या बाहेर उभे राहत … Continue reading दुपारची झोप

बाई, खोली आणि कर्म

मागचे दोन भाडोत्री करारनाम्या अगोदरच खोली खाली करुन निघून गेले. एकाचा अनुभव असता तर ठीक होतं, पण असं दोघां-दोघांना अश्याप्रकारचा अनुभव कसा काय येऊ शकतो?........ “अहो! भाडोत्री नंतर बघू, आधी तुम्ही या घराची वास्तूशांती करुन घ्या…… भटाला विचारुन!” दोन घर सोडून पलीकडे राहणारा शेजारचा एकजण सुधीरला बोलला. रिकाम्या असलेल्या रुममध्ये भाडोत्री मिळावा यासाठी तो इथं … Continue reading बाई, खोली आणि कर्म

एका तलावांचा भोवताल – यांतले तुम्ही कोण ?

शहरातल्या त्या ठिकाणी गेल्यावर नजरेस पडलेले काही प्रसंग आणि मनात आलेल्या आणि त्यावेळच्या आजूबाजूच्या पहाणीतले काही संदर्भ हे एका बाजूला……. आणि रिकामं डोक असताना पत्रकारितेच्या सुरवातीच्या दिवसात संपादकाना काही मजकूर दयावाचं लागेल या लगबगीत कागदावर जे जे अक्षर लागेल ते उमटवण्याचा केलेला प्रयत्न…….तो तिथं तलावाच्या काठी आला आणि झराझरा जे सुचेल ते लिहित गेला…त्या कागदातलं … Continue reading एका तलावांचा भोवताल – यांतले तुम्ही कोण ?